ATM CARD बाबत सूचना:

 • कार्ड सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
 • कार्डाच्या सुरक्षितते गोपनीय क्रमांक लिहून ठेवण्यापेक्षा लक्षात ठेवावा.
 • कार्ड धारकांनी शक्य तितक्या वेळा गोपनीय क्रमांक बदलत राहावा.
 • RUPAY ATM CARD हरवल्यास ग्राहकाने तातडीने दूरध्वनी किंवा पत्राद्वारे आपल्या शाखेत कळवावे.

 

 • कार्डला घडी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
 • गरम, थंड अथवा ओले असलेल्या ठिकाणी कार्ड ठेवू नये.
 • अनोळखी व्यक्तीला कार्ड देवू नये.
 • गोपनीय क्रमांक (PIN) कोणालाही सांगू नये.

ATM CARD वापराबाबत मार्गदर्शक सूचना:

 • SCREEN वर WELCOME आल्यानंतर दिलेल्या SLOT मध्ये कार्ड टाकण्यात यावे व लगेच कार्ड काढून घेण्यात यावे.
 • आपला चार अंकी गोपनीय क्रमांक टाकावा व नंतर CONFIRM चे बटन दाबावे.
 • नंतर आलेल्या SCREEN नुसार MINISTAT. , PIN CHANGE , CASH WITHDRAWL, BALANCE ENQUIRY आवश्यकतेनुसार दिलेल्या OPTION नुसार करावी.
 • नंतर खात्यानुसार SAVING / CURRENT चे बटन दाबावे.
 • थोड्यावेळाने रक्कम बाहेर येईल व सोबत ATM PRINTER मधून आपल्या व्यवहाराची PRINT निघेल. रक्कम घेतल्यानंतर EXIT चे बटन दाबावे.

महत्वाची सूचना:

आपल्या बँकेच्या ATM मध्ये इतर बँकेचे कार्ड वापरल्यास रक्कम खात्याला नावे पडली व पैसे न निघाल्यास याबाबतची तक्रार ज्या बँकेचे कार्ड असेल त्या बँकेत त्वरित नोंदवावी . सदर रक्कम जमा होण्याचा कालावधी सात दिवसाच्या आत आहे याबाबत नोंद घ्यावी.

Call on the Toll free number printed on back of your ATM card in case of any complaints regarding ATM Card.